Thursday, December 17, 2009

पर्यावरण संरक्षण...... भविष्याचं संवर्धन........


प्रत्येकाच्या जीवनात वाढदिवसाला अत्यंत महत्वाचे स्थान असते. वाढदिवसाच्या दिवसी आपण समाजाचे उतराई होण्याची गरज असते. या वर्षीचा वाढदिवस मी पर्यावरण संवर्धनाची प्रतीज्ञा घेऊन साजरा करणार आहे.
माझी
पर्यावरण संवर्धनाची प्रतीज्ञा
"मी या सृष्टीचा आपत्य आहे. या सृष्टीशी माझी बांधिलकी आहे. हि सृष्टी निकोप ठेवण्यासाठी मी वचनबद्ध होत आहे. भौतिक सोयी सुविधांच्या हव्यासापायी निसर्गाची होणारी हानी मी रोखणार आहे. वायू. जल, ध्वनी प्रदुषणाला आळा घालण्यासाठी मी सर्वोतोपरी प्रयत्न करेन. वनजीवन, वृक्षवल्ली, नद्या-झरे-तलाव-समुद्र, या सर्वानमुळेच माझे आस्तित्व टिकून आहे. म्हणून निसर्गच्या ह्या सर्व घाटकांचे अस्तित्व अबाधित राखण्यावर माझा भर असणार आहे.
वाढत चाललेले तापमान, थंडी-पावसाचा अनियमितपणा, त्सुनामी-फयान सारखी वादळे, आजार आणि पिकांवर येणारे रोग ह्या सर्वाच्या मुळाशी माझ्या बदलेल्या सवयी आहेत. हे मला कळले आहे. हे वाईटचक्र थांबवून बिघडलेल्या ऋतूचक्राला पूर्ववत करण्यासाठी मी सृष्टीला समर्पित होत आहे. "