Thursday, December 17, 2009

पर्यावरण संरक्षण...... भविष्याचं संवर्धन........


प्रत्येकाच्या जीवनात वाढदिवसाला अत्यंत महत्वाचे स्थान असते. वाढदिवसाच्या दिवसी आपण समाजाचे उतराई होण्याची गरज असते. या वर्षीचा वाढदिवस मी पर्यावरण संवर्धनाची प्रतीज्ञा घेऊन साजरा करणार आहे.
माझी
पर्यावरण संवर्धनाची प्रतीज्ञा
"मी या सृष्टीचा आपत्य आहे. या सृष्टीशी माझी बांधिलकी आहे. हि सृष्टी निकोप ठेवण्यासाठी मी वचनबद्ध होत आहे. भौतिक सोयी सुविधांच्या हव्यासापायी निसर्गाची होणारी हानी मी रोखणार आहे. वायू. जल, ध्वनी प्रदुषणाला आळा घालण्यासाठी मी सर्वोतोपरी प्रयत्न करेन. वनजीवन, वृक्षवल्ली, नद्या-झरे-तलाव-समुद्र, या सर्वानमुळेच माझे आस्तित्व टिकून आहे. म्हणून निसर्गच्या ह्या सर्व घाटकांचे अस्तित्व अबाधित राखण्यावर माझा भर असणार आहे.
वाढत चाललेले तापमान, थंडी-पावसाचा अनियमितपणा, त्सुनामी-फयान सारखी वादळे, आजार आणि पिकांवर येणारे रोग ह्या सर्वाच्या मुळाशी माझ्या बदलेल्या सवयी आहेत. हे मला कळले आहे. हे वाईटचक्र थांबवून बिघडलेल्या ऋतूचक्राला पूर्ववत करण्यासाठी मी सृष्टीला समर्पित होत आहे. "

Friday, December 4, 2009

मी हे करू शकतो!


लहानपणा पासून प्रत्येक गोष्ट वेळेवर मिळाल्या नंतर जर कॉलेज नंतर लगेच जॉब मिळाला नाही तर मनाची मोठी चलबिचल होत. नोकरी नसेल तर माणसांच्या नजरे बरोबर लोकांची आपल्याशी असणारा संवाद बदलत जातो. याच काळात आपली स्वताहाची किंमत आपल्या कळते. सकाळी उठेल्यावर आपल्यातील रितेपणाची जाणीव अस्वस्थ करतेय, संवेदन शून्यतेने दिवस ढकलावे लागतात. खरे तर ही परिस्थिती कायम अशीच राहणार नसते. संधी कोणत्या न कोणत्या रूपाने आपले दार ठोठावणार असते. मात्र तरीही हा काळ दुख:द असतो.
याचा परिणाम आत्मविश्वासावर होतो. आत्मविश्वास डळमळीत होण्यास सुरवात होते. संभ्रमावस्था वाढत जाते. या काळात आलेला नवा विचार एक संधी घेवून येतो शिवाय एक मोठे आव्हान आणि जोखीम सुद्धा घेऊन येतो. जर या संधीच आपण सोने करू शकलो नाही आणि अपयश पदरात पडले तर दरीत कोसळल्या सारखी स्थिती निर्माण होऊ शकते. असा आलेला विचार कोणतीच निर्णायक कृती करू देत नाही. वास्तवात आपला पराभव कोणीच करू शकत नाही मात्र मनात येणारे नकारार्थी विचारच आपला पराभव करून मोकळे होतात.
जीवन आपल्याला नेहमीच नवी संधी देत असतो. फक्त आपण त्या संधीचा फायदा घेतला पाहिजे. आयुष्यात माणसाला भरपूर माहिती असून सुद्धा केवळ योग्य वेळी कृती न केल्यामुळे आयुष्यभर दुखी राहावे लागते. त्यामुळे प्रत्त्येकाने योग्य वेळी कृती करण्याची गरज आहे. आणि हे केवळ तेव्हा शक्य आहे जेव्हा आपण आपल्या कामावर विश्वास ठेवून काम सातत्याने करत राहू.

Tuesday, December 1, 2009

ही कथा आहे अनुभव नव्हे


मी स्ट्रगलर नाटक...चित्रपट...टीव्ही इंडस्ट्रीला स्टगल हा शब्द नवा नाही. मात्र सध्या माझा स्टगल सुरु आहे तो चांगला पत्रकार होण्यासाठी. पत्रकारिता करताना मोठी उमेदवारी करावी लागते. ती करण्याची तयारी करूनच मी या क्षेत्राकडे आलो होतो. त्या मुळेच या तापलेल्या उन्हाची झळ मला भासत नाही. मी सध्या या उन्हाचा तप्त उन्हाळा एन्जॉय करतोय. मात्र कधीकधी या झळा इतक्या जीवघेण्या होतात की जीव कासावीस होतो. या खडतर वाटेवरुन चालताना आपल्या स्वप्नांचा चुराडा तर होणारा तर नाही ना? ही शंका काळीज चिरून टाकतेय.
मला पत्रकार व्हायचय! असे जेव्हा घरच्याना सांगितलं तेव्हा हा कसला हट्ट चांगली सरकारी नोकरी बघायची किवा एखाद्या खाजगी कंपनीत लिपिक म्हणून काम करायचं सोडून ही कसली अवकर बुद्धी सुचली तुला असा आई बाबा सोडून सगळ्यांनी सुर लावला. आई वडिलांच्या पाठीब्यामुळे पत्रकारित्येच्या क्षेत्रातच आपल करियर घडवायचं असं ठरवला आहे. सध्या वेगवेगळ्या वृत्तपत्र ऑफिसचे उंबरठे झिजवायला सुरवात केली आहे. मात्र प्रतिसाद मिळत नाही. महिन्यातुना एखादा लेख प्रसिद्ध होतो. तेवढाच आनंदाचा क्षण दिलासा देतो. आपली सामाजिक ओळख राखण्याकरिता ही झुळूक पुरेशी असते. कितीही संकट आली तरी आपला निश्चय कायम ठेवून. आपले ध्येय साध्य करायचच. हा निश्चय कायम आहे. शिवाय जग बदलेल तेव्हा बदलेल मात्र येणारी प्रत्येक संधी काहीतरी नव करण्याच आव्हान देते. हे आव्हान काम करण्याचा उत्साह देवून जाते.
पुढील जीवनात आपले स्वप्न खरे करू दाखवण्याचा मी प्रयत्न करणार आहे. म्हणूनच आज मी स्ट्रगलर आहे.

Sunday, November 29, 2009

महादेव मंदिर जिर्णोधार

आंबवली हे माझे मूळ गाव त्यामुळे तिथल्या प्रत्येक वास्तूशी माझा जवळचा संबंध. आमचं घर ज्या वाडीत आहे त्या वाडीचं नाव महादेव नगर कारण आमच्या वाडीत शंकराचा म्हणजेच महादेवाचं पुरातन मंदिर आहे. दरवर्षी महाशिव रात्रीला या मंदिरात मोठा उत्सव साजरा होतो. मुंबई स्थित सर्व चाकरमानी या उत्सवाला दर वर्षी हजेरी लावतात. त्या वेळी विद्यार्थ्यांच्या कला गुणांना प्रोत्साहन दिले जाते. अनेक वर्षांच्या प्रतीक्षे नंतर आज या मंदिराचं जिर्णोद्धार चे काम सुरु आहे. कोणत्याही बाहेरील मदती शिवाय केवळ वाडीतल्या लोकांच्या लोक वर्गणी मधून हे मंदिर साकारत आहे. या मंदिराचे बांधकाम जोरात सुरु आहे. तिथले फोटो इथे देता आहे.

Friday, November 27, 2009

मी मराठीचा मानाचा मुजरा.


मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याचे स्मरण गुरुवारी देशभर गांभीर्याने केले गेल्यानंतर आता अशा हल्ल्यापासून मुंबई खरोखरीच सुरक्षित झाली आहे का याचा शांतपणे आढावा घेण्याची वेळ आली आहे. गुप्तचर संघटना, कमांडो फोर्स आणि मुंबई पोलिसांनी हल्ल्याच्या दिवशी बजावलेल्या कामगिरीवर या हल्ल्याच्या स्मरणदिनानिमित्त पुन्हा एकदा प्रकाश टाकण्यात आला आहे. या सर्व शहीद वीरांना मी मराठीचा मानाचा मुजरा.