Tuesday, December 1, 2009

ही कथा आहे अनुभव नव्हे


मी स्ट्रगलर नाटक...चित्रपट...टीव्ही इंडस्ट्रीला स्टगल हा शब्द नवा नाही. मात्र सध्या माझा स्टगल सुरु आहे तो चांगला पत्रकार होण्यासाठी. पत्रकारिता करताना मोठी उमेदवारी करावी लागते. ती करण्याची तयारी करूनच मी या क्षेत्राकडे आलो होतो. त्या मुळेच या तापलेल्या उन्हाची झळ मला भासत नाही. मी सध्या या उन्हाचा तप्त उन्हाळा एन्जॉय करतोय. मात्र कधीकधी या झळा इतक्या जीवघेण्या होतात की जीव कासावीस होतो. या खडतर वाटेवरुन चालताना आपल्या स्वप्नांचा चुराडा तर होणारा तर नाही ना? ही शंका काळीज चिरून टाकतेय.
मला पत्रकार व्हायचय! असे जेव्हा घरच्याना सांगितलं तेव्हा हा कसला हट्ट चांगली सरकारी नोकरी बघायची किवा एखाद्या खाजगी कंपनीत लिपिक म्हणून काम करायचं सोडून ही कसली अवकर बुद्धी सुचली तुला असा आई बाबा सोडून सगळ्यांनी सुर लावला. आई वडिलांच्या पाठीब्यामुळे पत्रकारित्येच्या क्षेत्रातच आपल करियर घडवायचं असं ठरवला आहे. सध्या वेगवेगळ्या वृत्तपत्र ऑफिसचे उंबरठे झिजवायला सुरवात केली आहे. मात्र प्रतिसाद मिळत नाही. महिन्यातुना एखादा लेख प्रसिद्ध होतो. तेवढाच आनंदाचा क्षण दिलासा देतो. आपली सामाजिक ओळख राखण्याकरिता ही झुळूक पुरेशी असते. कितीही संकट आली तरी आपला निश्चय कायम ठेवून. आपले ध्येय साध्य करायचच. हा निश्चय कायम आहे. शिवाय जग बदलेल तेव्हा बदलेल मात्र येणारी प्रत्येक संधी काहीतरी नव करण्याच आव्हान देते. हे आव्हान काम करण्याचा उत्साह देवून जाते.
पुढील जीवनात आपले स्वप्न खरे करू दाखवण्याचा मी प्रयत्न करणार आहे. म्हणूनच आज मी स्ट्रगलर आहे.

1 comment: