Monday, October 25, 2010

तयारी दिवाळीची.

बघता बघता ऑक्टोबर सरला आणि दिवाळीची तयारी सुरू झाली मागील काही दिवस मनात खूप गोष्टी मांडायच्या मांडायच्या पण कामाच्या गडबडीत ब्लॉग अपडेट करायाच राहून जाते. या अगोदर नेटसाठी सायबर मधे जावे लागत होते वाटला होत घरी नेट आल्यास काम करणे सोपे जाइल मात्रा तरी देखेल ब्लॉग अपडेट करण्यास अडचण येते आहे. दसर्‍याच्या दिवशी नवा ब्लॉग सुरू करण्याचा विचार मनात आला तो लवकरच अमलात आणण्याचा प्रयत्न असून केवळ बातमीदारी आणि पत्रकारितेच्या विच्यारांशी बंधिलकी असणारा नवा ब्लॉग दिवाळीच्या मुहूर्तावर सुरू करायचा विचार सुरू आहे. सगळी परिस्थिती कायम राहिल्यास हा विचार केवळ विचार राहणार नाही तर ते सत्यात देखील येऊ शकेल. अपेक्षा आहे ती आपल्या आशीर्वादची. आणि हो माझ्या ब्लॉग पाहणार्‍या सर्वा मंडळींचे मनापासून धन्यवाद लवकरच आपल्याला आनंद देईल असे रूप या ब्लॉग वर पाहायला मिळेल अशी खात्री देतो. आपण माझ्याशी जोडुन राहिल्या बद्दल मन पूर्वक आभार.   

Friday, April 30, 2010

संयुक्त महाराष्ट्राचा असंयुक्त सुवर्ण महोत्सव!

महाराष्ट्राचा सुवर्ण महोत्सवी वर्षा साजरा करणे हा प्रत्येक महाराष्ट्रीयन माणसांसाठी आनंदाची आणि अभिमानाची गोष्टा आहे. हा सुवर्णा महोत्सव मोठया जल्लोषा मध्ये साजरा व्हावा ही प्रत्येक मराठीमाणसाची अपेक्ष्या होती. अपेक्षेप्रमाणे मोठ्या उत्साहात महाराष्ट्राचा सुवर्णा महोत्सव धुमधदक्यातसाजरा होत आहे. याचा आनंद असला तरी प्रत्येक पक्षा वेगवेगळ्या स्तरावर हे कार्यक्रम साजरा करूनआपला पक्ष कश्याप्रकारे खरा कार्यक्रम साजरा करत आहेत. हे दाखवण्याची कसरत करीत आहेत. शिवसेन, मनसे, कॉंग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजपा यासारख्या सर्व पक्ष्यानी आपले सर्व मतभेद विसरून महाराष्ट्राचा हा सुवर्णा महोत्सव
एकत्र पणे साजरा करणे गरजेचे होते. राबवले गेलेले अनेक उपक्रम चांगले आहेत. मात्रा शिवसेनमनसेला शहा देते. तर नव्या उपक्रमांची सुरवात करून आघाडीला देखील वाटते की आपणच महाराष्ट्राचेभाग्यविदाते आहोत असेच वाटत आहे. उपक्रम चांगले असले तरी ते असंयुक्त पणे साजरा होत असल्यामुळे मराठी माणसासाठी ते खूप घातक आहेत असे मला वाटते. एक तरी कार्यक्रम एकत्र व्हावा असे मनापासून वाटते. सर्व वाचकांना.............................

सुवर्णमहोत्सवी महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा…

जय महाराष्ट्र

Saturday, April 24, 2010

माझं कोंकण: कोंकण ही महाराष्ट्राची ओळखा आहे. कोंकणातून नुकताच जाऊन आलो तेव्हा काढलेले फोटो एथे देत आहे.

कोकणच्या वाटेवर...........
खरा कोकण........


खेड रेल्वेस्टेशन.......
आंबली झोलाई मंदिर.......

Tuesday, March 2, 2010

माझा पदवीदान समारंभ पुणेपुणे विद्यापीठाचा २१ वा पदवीदान समारंभात मुंबई पत्रकार संघाचे पाच विद्यार्थी सहभागी झाले होते. मी देखील पत्रकारितेचा अभ्यासक्रम पुर्ण केल्या बदल सन्मानित करण्यात आले. विदार्थी दशेतील मोठा सन्मान मिळाला असे मला वाटे. प्रत्येक विदार्थ्याला असा सन्मान मिळणे म्हणजे आकाश ठेंगणे होते. मुंबई मराठी पत्रकार संघाचे पाच विद्यार्थी या कार्यक्रमास उपस्थित होते. प्रथम क्रमांक मिळवलेली नम्रता शेवडे हिचा विशेष सन्मान झाला.
रविवार दिनांक २८ फेब्रुवारी रोजी पुणे शहरातील गुलटेकडी परिसरातील विद्यापीठ परिसरात हा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाला देश विदेशातली शेकडो विद्यार्थी उपस्थित होते. या कार्यक्रमातील माझा फोटो आणि माझ्या सोबत सभागी झालेल्या माझ्या मित्र मैत्रिणींचे फोटो इथे देत आहे.

Wednesday, February 17, 2010

फोटो मंदिर जिर्णोधारचे
महादेव मंदिर जिर्णोधार कार्यक्रम नुकताच झाला या कार्यक्रमाचे सर्वाना निमंत्रण दिले होते. हा कार्यक्रम व्यवस्थित पार पडला या कार्यक्रमाचे फोटो इथे देत आहे.

Monday, February 8, 2010

श्री महादेव मंदिर जिर्णोधार सोहळा.


हा!हा!हा! म्हणता मंदिराचे बांधकाम पूर्ण झाले आणि आला उद्घाटनाचा दिवस अनेक लोकांच्या प्रयत्नातून ही वास्तू सकारात आहे. या मंदिराच्या उद्घाटनाचे सर्वाना प्रेम पूर्वक आमंत्रण.

Saturday, February 6, 2010

सह्याद्रीच्या पायथ्याशी शिवभक्तांचा उत्सव.

कोकणातील माणसे मोठी उत्सव प्रेमी आणि खूपच भाविक त्यामुळे प्रत्येक उत्सव आनंदात साजरा करणे ही त्यांची जुनी परंपरा. सध्या कोकणात अंगणेवाडीची जत्रा मोठ्या उत्सवात सुरु आहे. अनेक कोकणी मंडळी या जत्रेला आवर्जून हजेरी लावतात. कोकणात सध्या याचा जत्रेची मोठी चर्चा आहे. सिंधुदुर्ग जिल्हा पाहुण्याच्या पाहुणच्यारात आणि चाकरमान्यांच्या स्वागतात रमला असतानाच रत्नागिरी जिल्हातील खेड तालुक्यामध्ये देखील नव्या मंदिराच्या उदघाटन सोहळ्याची जोरात तयारी सुरु आहे.
काही दिवसापूर्वी माझ्या ब्लॉगवर महादेव मंदिराच्या जिर्णोधार विषयाची पोस्ट प्रकाशित केली होती. लवकरच या महादेव मंदिराचे उदघाटन होणार आहे. या कार्यक्रमासाठी मुंबई, पुणे, कोल्हापूर, नाशिक या ठिकाणी गेलेली सर्व गावकरी मंडळी येणार आहेत. ९ फेब्रुवारी पासून चालणारा हा कार्यक्रम १३ तारखेपर्यंत चालणार आहे. तमाम मित्र आणि इंटरनेट मित्रांना मी आग्रहाचे आमंत्रण देत आहे. या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची विनंती कार्यक्रम पत्रिका लवकरच ब्लॉगवर जोडेन फोटो ही जोडेन.
कार्यक्रम स्थळ - मुक्काम पोस्ट आंबवली तालुका खेड जिल्हा रत्नागिरी