Friday, January 1, 2010

३१ डिसेंबर २००९ पर्यंतच्या जुन्या आठवणी

१ जानेवारी म्हणजे नव्या वर्षाची सुरवात आज मागील वर्षाला निरोप देऊन नव्या वर्षाचे आनंदाने स्वागत करायचे असते. मी या ३१ डिसेंबर २००९ रोजी माझ्या आयुष्यामध्ये घडलेल्या जुन्या आठवणींना उजाळा दिला. माझा जन्म १६ डिसेंबर १९८७ चा तेथ पासून आज पर्यंत २२ वर्ष सरली या २२ वर्षात मी काय कमावलं आणि काय गमावलं याची आठवण मला होत आहे. तुम्ही म्हणाल हा ब्लोग लिहितोय की आत्मचरित्र पण हा ब्लोग म्हणजे माझा जीवन आहे. माझ्या आयुष्यातील लहान मोठ्या मला लिहाव्या वाटणाऱ्या सर्व घटना इथे असणार आहेत. आज १ जानेवारी २०१० नव्या वर्षाची सुरवात. आजचा दिवस वर्षाचा सुरवातीचा दिवस असल्यामुळे अनेक संकल्प आणि वर्षाचे नियोजन आज करण्यात लोक वेळ देतात. मी आज माझा जुना अल्बम उघडला आणि त्यात माझ्या लहानपाणीच फोटो मिळाला. तो इथे देत आहे. हा फोटो मी माझ्या ब्लॉगवर प्रकाशित करत आहे. किमान २० वर्ष जुना हा फोटो माझ्या लहानपणाची आठवण करून देतो. हा फोटो पाहताना तुकारामांचा अभंग आठवतो
लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा
आज पर्यंत चे आयुष्य मला त्याप्रमाणे आपल्याला चांगले गेले आहे. त्या प्रमाणेच पुढील आयुष्य सुखाचे, समृद्धीचे, आनंदाचे आणि भरभराटीचे जाओ हीच ईश्वरचरणी प्रार्थना.