Wednesday, February 17, 2010

फोटो मंदिर जिर्णोधारचे




महादेव मंदिर जिर्णोधार कार्यक्रम नुकताच झाला या कार्यक्रमाचे सर्वाना निमंत्रण दिले होते. हा कार्यक्रम व्यवस्थित पार पडला या कार्यक्रमाचे फोटो इथे देत आहे.

Monday, February 8, 2010

श्री महादेव मंदिर जिर्णोधार सोहळा.


हा!हा!हा! म्हणता मंदिराचे बांधकाम पूर्ण झाले आणि आला उद्घाटनाचा दिवस अनेक लोकांच्या प्रयत्नातून ही वास्तू सकारात आहे. या मंदिराच्या उद्घाटनाचे सर्वाना प्रेम पूर्वक आमंत्रण.

Saturday, February 6, 2010

सह्याद्रीच्या पायथ्याशी शिवभक्तांचा उत्सव.

कोकणातील माणसे मोठी उत्सव प्रेमी आणि खूपच भाविक त्यामुळे प्रत्येक उत्सव आनंदात साजरा करणे ही त्यांची जुनी परंपरा. सध्या कोकणात अंगणेवाडीची जत्रा मोठ्या उत्सवात सुरु आहे. अनेक कोकणी मंडळी या जत्रेला आवर्जून हजेरी लावतात. कोकणात सध्या याचा जत्रेची मोठी चर्चा आहे. सिंधुदुर्ग जिल्हा पाहुण्याच्या पाहुणच्यारात आणि चाकरमान्यांच्या स्वागतात रमला असतानाच रत्नागिरी जिल्हातील खेड तालुक्यामध्ये देखील नव्या मंदिराच्या उदघाटन सोहळ्याची जोरात तयारी सुरु आहे.
काही दिवसापूर्वी माझ्या ब्लॉगवर महादेव मंदिराच्या जिर्णोधार विषयाची पोस्ट प्रकाशित केली होती. लवकरच या महादेव मंदिराचे उदघाटन होणार आहे. या कार्यक्रमासाठी मुंबई, पुणे, कोल्हापूर, नाशिक या ठिकाणी गेलेली सर्व गावकरी मंडळी येणार आहेत. ९ फेब्रुवारी पासून चालणारा हा कार्यक्रम १३ तारखेपर्यंत चालणार आहे. तमाम मित्र आणि इंटरनेट मित्रांना मी आग्रहाचे आमंत्रण देत आहे. या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची विनंती कार्यक्रम पत्रिका लवकरच ब्लॉगवर जोडेन फोटो ही जोडेन.
कार्यक्रम स्थळ - मुक्काम पोस्ट आंबवली तालुका खेड जिल्हा रत्नागिरी